परिवहन विभागाकडून वाहन तपासणीतून महसूल वसूल

By Admin | Updated: February 16, 2016 23:04 IST2016-02-16T22:54:14+5:302016-02-16T23:04:05+5:30

परिवहन विभागाकडून वाहन तपासणीतून महसूल वसूल

Recovery of revenue from vehicle inspection by transport department | परिवहन विभागाकडून वाहन तपासणीतून महसूल वसूल

परिवहन विभागाकडून वाहन तपासणीतून महसूल वसूल

वणी : प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आदेशाअन्वये विशेष तपासणी मोहिमेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, या विभागाला कारवाईच्या माध्यमातून मोठा महसूल प्राप्त होतो आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्या आदेशानुसार मार्च महिन्याचे अंतिम सत्र उद्दिष्टपूर्ती कालावधीसाठी अशा कारवाईसाठी निश्चित करण्यात आले असून जिल्हाभरात ही मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने दिंडोरी तालुक्यात सध्या ही मोहीम सुरू आहे. दहा कर्मचाऱ्यांचे पथक दिवसभर तीन शिफ्टमधे काम करत असून, योग्यता प्रमाणपत्र, संपुष्टात आलेले परवाने, क्षमतेपेक्षा जास्त भार वाहतूक करणे, कर भरण्यास टाळाटाळ करणे, अवैध प्रवासी वाहतूक या व अशा वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनमालकांवर व चालकांवर या कारवाईमुळे संक्रांत आली आहे. दिंडोरी तालुक्यातील राज्यमार्ग क्र.१७ व २३ या मार्गावर मोक्याची ठिकाणे हेरून अधिकाऱ्यांचे पथक वाहनांची तपासणी व कारवाई करत आहे. काही वाहनांवर जागेवर दंडात्मक कारवाई, काही वाहनांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येत आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Recovery of revenue from vehicle inspection by transport department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.