त्र्यंबक नगरपरिषदेची वसुली मोहीम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:53 IST2021-03-31T22:33:40+5:302021-04-01T00:53:58+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.

त्र्यंबक नगरपरिषदेची वसुली मोहीम !
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे.
मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.
त्र्यंबक नगरपरिषदेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती कर्मचा-यांना पगाराला देखील पैसे देण्याइतपत नव्हती. दरम्यान शासन लॉकडाउन लागु करण्याचा विचार करीत आहे. यावेळेस अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणुन वसुलीची धडक मोहीम सुरु केली आहे.
गावात प्रवेश करण्यापुर्वी वाहनतळ फी वसुली, जागा भाडे वसुली, पालिका गाळे वसुली आदींपासुन कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण मागच्या वर्षी यापैकी काहीच वसुली करण्यात आली नव्हती. सध्या जी वसुली सुरु आहे, ती मागच्या वर्षासह करण्यात येत आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी यांच्यात झालेली वाढ, वर्षभर जरी बील थकले तरी दंड व्याज वसुल केले जाते. त्यामुळे पालिका गंगाजळीत चांगल्या प्रमाणे उत्पन जमा होईल. यावेळी यदाकदाचित जरी लॉकडाउनची वेळ आली तरी पालिकेला आर्थिक परिस्थितीची झळ बसणार नाही. त्यामुळेच पालिकेने सर्वच कार्यालयीन कर्मचा-यांना वसुलीची जबाबदारी देत बाहेर काढले आहे.
नगरपरिषदेला तसे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट असतांना प्रत्येक पालिकांची वसुली किमान ८० टक्के तर व्हावयास हवी. आणि शासकीय अनुदाने मिळतांना ८० टक्के वसुलीचे टार्गेट असते. सध्या जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची वसुलीची लगीनघाई सुरु आहे. त्र्यंबक नगरपरिषदेची देखील एवढी जोरदार वसुली असतांना अजुन ५० टक्के सुध्दा वसुलीच पुर्ण झालेली नाही.
दरम्यान वसुलीसाठी पाणी पुरवठा इन्चार्ज कर निर्धारणा विभाग विजय सोनार मधुकर माळी मुख्याधिकारी चित्ते, संजय जाधव आदी परिश्रम घेत आहेत.