शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:08 IST

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असणाऱ्या शंभरहून अधिक थकबाकीदारांना मनपाच्या वतीने वॉरंट बजाविण्यात आले असून, मुदतीनंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक आहे. यंदाच्या वर्षी वरिष्ठांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख, तर पाणीपट्टीचे २० कोटी ८० लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आला आहेत. तसेच ५० हजार रुपयांपर्यत थकबाकी असणाºया शंभराहून अधिक थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्यात आले असून, यानंतर २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदत दिल्यानंतरही थकबाकी न भरल्यास थकबाकीदारांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव काढण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. घरपट्टीच्या ४६ कोटी ३५ लाख उद्दिष्टापैकी मंगळवारपर्यंत (दि.२६) सुमारे २१ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली, तर पाणीपट्टीच्या २० कोटी ८० लाख उद्दिष्टापैकी ८ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली आहे. एकूणच घरपट्टी व पाणीपट्टी मिळून ३० कोटी इतकी वसुली झाली आहे.जप्तीची कारवाईमार्चअखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाकडून थकबाकीदारांना तगादे लावण्यात येत असून, यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू.महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी धडक वसुली मोहीम सुरू आहे. वरिष्ठांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असणाºया शंभराहून अधिक थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.  - डॉ. सुनीता कुमावत, विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर