सिडकोतून एक कोटीची घरपट्टी वसूल

By Admin | Updated: April 30, 2015 23:43 IST2015-04-30T23:39:59+5:302015-04-30T23:43:45+5:30

सिडकोतून एक कोटीची घरपट्टी वसूल

Recovered one crore housepad from CIDCO | सिडकोतून एक कोटीची घरपट्टी वसूल

सिडकोतून एक कोटीची घरपट्टी वसूल

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने महिनाभरात घरपट्टीची सुमारे एक कोटी दहा लाखांची विक्रमी वसुली झाली. मनपाने आर्थिक वर्षात एप्रिलच्या पहिल्याच महिन्यात मिळकतधारकांनी घरपट्टी भरल्यास बिलात एकदम ५ टक्के सवलत दिल्याने या सवलतीचा सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने याआधी आर्थिक वर्षात एप्रिलच्या पहिल्याच महिन्यात घरपट्टी भरणाऱ्यांना १ टक्काच सूट देण्यात येत होती. तेव्हा महिनाभरात जेमतेम लाख रुपयांची वसुली होत होती. परंतु यंदाच्या वर्षी मनपा आयुक्तांनी यात वाढ करून एकदम ५ टक्के केल्याने यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. १ ते ३० एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत सिडकोतील सुमारे १२ हजारांहून अधिक नागरिकांनी घरपट्टी भरली. यापोटी सुमारे एक कोटी दहा लाखांची विक्रमी वसुली झाली. मनपाने ५ टक्के सवलत दिल्याने याचा अनेक मिळकतधारकांनी लाभ घेतला असून, शेवटच्या दिवसापर्यंत घरपट्टी भरण्यासाठी गर्दी होती. (वार्ताहर)

Web Title: Recovered one crore housepad from CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.