सापडलेले १६ हजार रुपये केले परत
By Admin | Updated: June 8, 2017 00:52 IST2017-06-08T00:52:43+5:302017-06-08T00:52:58+5:30
सापडलेले १६ हजार रुपये केले परत

सापडलेले १६ हजार रुपये केले परत
येवला : आजही समाजात काही अशी माणसे आहेत जी पैशांपेक्षा माणुसकीचा विचार करताना दिसतात. याचाच प्रत्यय गुरु वारी येवला मर्चंट बँकेत आला. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याने सोने तारण ठेवून काढलेल्या कर्जाची १६ हजार रु पये रक्कम बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ पडली. ती बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी शेखर मेहता यांना सापडली. मेहता यांनी प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तत्परतेने ती रक्कम बँकेचे अकाउंटंट यांच्यामार्फत शेतकऱ्याला परत केली.
येवला मर्चंट को-आॅप. बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी शेखर मेहता यांना १ जून रोजी बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ १६ हजार रु पये सापडले. त्यांनी ती रक्कम बँकेच्या लेखापालांकडे जमा केली. ते पैसे वैजापूर तालुक्यातील शेतकरी रघुनाथ वाघ यांनी सोने तारण ठेवून बँकेतून काढले होते. परंतु अनवधानाने ती रक्कम त्यांच्याकडून बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ पडली. याबाबत बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे योग्य ती चौकशी करून शेखर मेहता यांच्या हस्ते ही रक्कम रघुनाथ वाघ यांना देण्यात आली. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व त्यांनी मेहता यांचे आभार मानले. शेखर मेहता यांच्या प्रामाणिकपणाबाबत बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष पंकज पटेल, संचालक सुशील गुजराथी, बँकेचे ज्येष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी, प्रभाकर झळके, जैन समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विलास पटणी, लेखापाल अरविंद जोशी, कर्मचारी सागर पटेल, ज्ञानेश्वर गोठला, धीरज परदेशी उपस्थित होते