शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मुहूर्तावर होणार विक्रमी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:26 IST

नवरात्रोत्सवामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढली आहे. ग्राहकांची दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळत असून, आर्थिक नियोजनाला प्राधान्य देणाºया नागरिकांकडून मात्र गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढली आहे. ग्राहकांची दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळत असून, आर्थिक नियोजनाला प्राधान्य देणाºया नागरिकांकडून मात्र गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.नवरात्री आणि दसºयाच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमध्ये मागणी वाढली आहे. वाहनांची बुकिंग आणि डिलिव्हरी वाढत असून इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन विक्री दालने, सराफी पेढ्यांना झळाळी मिळाली आहे. विविध कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य यामुुळे वाहन विक्री गतवर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढली आहे. नवरात्रीच्या काळात बाजारात रोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून दसºयानंतर दिवाळीपर्यंत खरेदीचा हा उत्साह असाच कायम राहील, असा व्यावसायिकांना विश्वास आहे. मांगल्याचा सण म्हणून नवरात्रीकडे बघितले जाते. या काळात शुभकार्य होतात. ज्यात खरेदीला विशेष पसंती मिळते.  वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स ग्राहकांना खरेदीकरिता प्रोत्साहन देत आहेत. शून्य डाउन पेमेंट, विशिष्ट बँकेची क्रेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त डिस्काउंंट, कॅशबॅक यांसारख्या आॅफर्सची चलती आहे. वित्तसंस्थांनी कर्जप्रक्रिया सुलभ केली असून, शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज आणि सुलभ हप्ते यांमुळे घर, वाहन आणि सोने खरेदीसोबत गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांची पावले वळत आहेत.घर खरेदीला अधिक पसंतीपितृपक्षापासूनच घरांची चौकशी ग्राहकांकडून सुरू असून नवरात्रात बुकिंगही होत असून दसºयाच्या मुहूर्तावरही अनेकजण घर खरेदी करण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे विविध बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये सध्या ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. २० ते ३० लाखांपर्यंतच्या घरांना मागणी असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून अनुदानाचा मिळणारा लाभही ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे.विक्रमी वाहन  विक्रीची अपेक्षापहिल्या माळेपासूनच कंपन्यांच्या शोरूम्समधूून डिलिव्हरी द्यायला सुरुवात झाली असून, दसºयाच्या मुहूर्तावर विक्रमी वाहन विक्रीची वेगवेगळ्या कंपनीच्या शोरूमचालकांना अपेक्षा आहे. पाचव्या, सातव्या माळेला वाहन बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली तर काही जणांनी अगदी पहिल्या माळेपासून बुकिंग करून दसºयालाही वाहनांची डिलिव्हरी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासोबतच दसºयाच्या दिवशी ऐनवेळी येणाºया ग्राहकांनाही वाहने उपलब्ध करून देण्याची तयारी व्यावसायिकांनी ठेवली आहे. त्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा १० ते १२ टक्के जास्त विक्री होण्याची वेगवेगळ्या शोरूमचालकांना अपेक्षा आहे.

टॅग्स :MarketबाजारGoldसोनंcarकारHomeघर