जिल्ह्यात ८२ हजार लसीकरणाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:49+5:302021-09-18T04:16:49+5:30

केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे याकाळात अनेक ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली तरीही गर्दी कमी होत नव्हती. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यासाठी ...

Record of 82,000 vaccinations in the district | जिल्ह्यात ८२ हजार लसीकरणाचा विक्रम

जिल्ह्यात ८२ हजार लसीकरणाचा विक्रम

केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे याकाळात अनेक ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली तरीही गर्दी कमी होत नव्हती. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यासाठी हजारोंच्या संख्येने लसीचे डोस मिळू लागल्याने लसीकरण मोहिमेची गती वाढली. प्रतीक्षेत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. याच काळात दिवसेंदिवस लसीकरणाचा आकडा वाढत गेला. एकाच दिवसात ५५ हजारांपासून ६५ हजार ७२ हजार ७६ हजारांपर्यंत आकडा पोहोचला. १७ सप्टेंबरला त्यात आणखी वाढ होऊन ८२ हजारांच्या पुढे लसीकरण झाले. सायंकाळपर्यंत ८० हजार इतका लसीकरणाचा आकडा नोंदविला गेला. त्यानंतर रात्री आठ वाजल्यानंतर संख्या ८२ हजारांच्या पुढे पोहोचली. त्यानंतरही लसीकरण सुरू होते तरीही ८२ हजार लसींचे डोस या मोहिमेतील एकाच दिवसातील लसीकरणाचा हा उच्चांक ठरला आहे.

Web Title: Record of 82,000 vaccinations in the district