जुन्या सार्वजनिक शौचालयांची नव्याने उभारणी पालिकेकडून फेरनिविदा : सुमारे तीन कोटी रुपयांची कामे

By Admin | Updated: June 2, 2014 00:34 IST2014-06-01T23:31:41+5:302014-06-02T00:34:36+5:30

नाशिक : शहरातील काही उपनगरांसह झोपडप˜्यांमधील जुनी झालेली सार्वजनिक शौचालये तोडून त्याठिकाणी नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी महानगरपालिकेने फेर ई-निविदा काढल्या असून, सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या सार्वजनिक शौचालयांमुळे त्या-त्या परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Reconstruction of old public toilets by the corporation: About three crore rupees works | जुन्या सार्वजनिक शौचालयांची नव्याने उभारणी पालिकेकडून फेरनिविदा : सुमारे तीन कोटी रुपयांची कामे

जुन्या सार्वजनिक शौचालयांची नव्याने उभारणी पालिकेकडून फेरनिविदा : सुमारे तीन कोटी रुपयांची कामे

नाशिक : शहरातील काही उपनगरांसह झोपडप˜्यांमधील जुनी झालेली सार्वजनिक शौचालये तोडून त्याठिकाणी नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी महानगरपालिकेने फेर ई-निविदा काढल्या असून, सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या सार्वजनिक शौचालयांमुळे त्या-त्या परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शहरात अनेक उपनगरांसह झोपडप˜्यांमध्ये महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. परंतु अनेक शौचालयांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, भांडी फुटलेली आहेत, पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील नागरिक बाहेरच प्रातर्विधी उरकत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. विशेषत: महिलावर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असते. महापालिकेने सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेसाठी जुन्या शौचालयांची पाहणी करून त्यांच्या जागेवर नव्याने सुलभ व सार्वजनिक शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील समतानगर येथे डीपीरोडजवळील जुने शौचालय तोडून नवीन महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच पूर्व विभागातीलच प्रभाग क्रमांक ३१ मधील आंबेडकरवाडी येथे जुने शौचालय तोडून नव्याने २० सिट्सचे शौचालय उभारण्यात येणार आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ५८ मध्ये राजवाडा येथील जुने शौचालय तोडून नवीन शौचालय बांधण्यात येणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २० मध्ये संगम चौक स्वारबाबानगर येथील जुने सार्वजनिक शौचालय तोडून त्याच जागेत नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्रभाग ५० मधील महादेववाडी येथे २० सिट्सचे नवीन सुलभ शौचालय, प्रभाग २१ मधील संत कबीरनगर जांगीर बाबा चौक येथे सार्वजनिक शौचालय, पूर्व विभागातील प्रभाग ४० मधील शिवाजीवाडी येथे नासर्डीलगत १० सिट्सचे दोन शौचालय, पंचवटीतील प्रभाग ९ मधील सम्राटनगर गौडवाडी येथे मनपा शाळेलगत सार्वजनिक शौचालय, प्रभाग २४ मधील उंटवाडीरोड क्रांतीनगर झोपडप˜ीत नवीन सुलभ शौचालय, प्रभाग १० मधील वाघाडी नदीलगत वाल्मीकनगर, श्रीराम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालय, प्रभाग २२ मधील सिद्धार्थनगर येथे शौचालय, प्रभाग २१ मधील संत कबीरनगर येथे सार्वजनिक शौचालय, सातपूर विभागात चुंचाळे येथील कोळीवाडा १२ सिट्सचे सार्वजनिक शौचालय, तर प्रभाग ४५ मध्ये पंडितनगर येथे १० सिट्सचे सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे.

शौचालयांच्या दुरवस्थेस नागरिकच जबाबदार
महापालिकेमार्फत झोपडप˜ी परिसरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते; परंतु या शौचालयांचे दरवाजे, खिडक्या काढून नेल्या जातात. शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देऊनही परिसरातील नागरिक शौचालयाबाहेरच नैसर्गिक विधी उरकत असल्याने अस्वच्छता वाढीस लागते. शौचालयांची भांडीही फोडली जातात. पाण्याचा वापर अन्य कामांसाठी केला जातो. त्यामुळे पालिकेकडूनही देखभाल-दुरुस्तीबाबत पुढाकार घेतला जात नाही. परिसरातील सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य जपण्याचे काम परिसरातील नागरिकांच्याच हाती असताना आपल्या गैरकृत्यातून काही समाजकंटक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू पाहत आहेत.

Web Title: Reconstruction of old public toilets by the corporation: About three crore rupees works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.