विज्डम हाय विद्यार्थिनीच्या संशोधन कल्पनेला मान्यता
By Admin | Updated: November 28, 2014 22:38 IST2014-11-28T22:38:26+5:302014-11-28T22:38:51+5:30
विज्डम हाय विद्यार्थिनीच्या संशोधन कल्पनेला मान्यता

विज्डम हाय विद्यार्थिनीच्या संशोधन कल्पनेला मान्यता
नाशिक : येथील विज्डम हाय या शाळेतील विद्यार्थिनी शर्वरी तांबट हिने ‘माईक साऊंड अॅडजेस्टर’ याबाबत संशोधनाच्या मांडलेल्या कल्पनेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने तिचा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते अहमदाबाद येथे सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल शाळेत मुख्याध्यापक शालिनी कडवे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
विज्डम हाय या शाळेत दहावीत शिकणाऱ्या शर्वरीने वक्त्याच्या आवाजानुसार ध्वनीची पातळी निश्चित करण्यासंदर्भात संशोधनाची कल्पना मांडली आहे. या संशोधनाच्या कल्पनेचे केंद्र सरकारने शर्वरीच्या नावावर पेटंट घेतले आहे. याच कल्पनेचे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आॅफ इंडियाने ‘मॉडेल’ तयार केले आहे. अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट या संस्थेत हे मॉडेल प्रदर्शनात मांडण्यात आले होते. (प्रतिनिधी)