शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

फेब्रुवारीपासून पुन्हा रेशनमधून मक्याची रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 7:01 PM

नाशिक जिल्ह्यात यंदा अपु-या पावसामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत यंदाही मक्याची खरेदी केली. जिल्ह्यातील दहा केंद्रावर डिसेंबर महिन्यात मका खरेदी करण्यात आला असून, सध्या त्याची साठवणूक शासकीय गुदामात केली जात आहे,

ठळक मुद्देप्रत्येकी एक किलोचे वाटप : अगोदर दर्जाची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षी बम्पर उत्पादन झालेला मका थेट रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या राज्य सरकारने यंदाही तोच कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला असून, आधारभूत किमतीत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला सुमारे २२ हजार क्विंटल मका पुढच्या महिन्यापासून रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात यंदा अपु-या पावसामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत यंदाही मक्याची खरेदी केली. जिल्ह्यातील दहा केंद्रावर डिसेंबर महिन्यात मका खरेदी करण्यात आला असून, सध्या त्याची साठवणूक शासकीय गुदामात केली जात आहे, परंतु तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेला मका गुदामातच सडल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शासनाने गेल्या वर्षापासून त्या त्या जिल्ह्यात खरेदी केलेल्या मक्याची त्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी जवळपास दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी होऊन तितका मका सलग सहा महिने पुरवठा खात्याच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, त्यांचे मुख्य अन्न भात व नागली आहे, अशा वेळी त्यांच्याकडून रेशनमधून मिळणाºया मक्याला विरोध करण्यात आला. परंतु सरकारने सक्ती केल्यामुळे अगदी शेवटी नागरिक नको नको म्हणत असतानाही त्यांना दरमहा मिळणाºया गव्हाऐवजी मक्याची रोटी खावी लागली होती. यंदाही आधारभूत किमतीत खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना पाच किलो, तर अन्न सुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरलेल्या प्रती व्यक्तीस एक किलो याप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिकाधारकास पाच किलोपर्यंत मका दिला जाणार आहे.शासनाने १५ जानेवारीपर्यंत आधारभूत किमतीत मका खरेदीला मुदतवाढ दिल्यामुळे तोपर्यंत खरेदी होणाºया मक्याचे प्रमाण लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यापासून रेशनमधून वाटप केले जाणार आहे. सदरचा मका खाण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबत अगोदर भारतीय अन्न महामंडळ व गुणवत्ता नियंत्रक यांच्याकडून त्याची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर खरेदी केलेल्या मक्याच्या साठवणूक गोदामात तो खराब होेऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचेही आदेश आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक