श्रावणमासात एसटीला मिळाले भरभरून दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:35 IST2017-08-27T00:35:17+5:302017-08-27T00:35:21+5:30
धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे.

श्रावणमासात एसटीला मिळाले भरभरून दान
नाशिक : धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे. श्रावणात देशभरातून भाविकांनी शनिवार, रविवार आणि सोमवारी विक्रमी व इतर दिवशी लक्षणीय गर्दी केली होती. भगवान त्र्यंबकराजा, संत निवृत्तिनाथ महाराज यांचे दर्शन, चतुर्मासनिमित्त कुशावर्तात स्नान, ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत आदी ठिकाणांना भेटी, दर सोमवारी ब्रह्मगिरीला मारली जाणारी फेरी तसेच पहिने, दुगारवाडी, त्र्यंबकरोड, जव्हार रस्ता आदि पर्यटन स्थळांना भेट देत वीकएण्ड साजरा करणाºया पर्यटकांमुळे यंदा संपूर्ण श्रावण महिन्यात नाशिक ते त्र्यंबक दरम्यान एसटी महामंडळाच्या ५९१० फेºया झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराकडून देण्यात आली. पाचही श्रावणी सोमवारी, नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, पतेती, अजाएकादशी, श्रावणी अमावास्या अशा महत्त्वाच्या दिवसांना होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकदरम्यान मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
पहिल्या श्रावणी सोमवारी एसटीद्वारे ७१३२, दुसºया सोमवारी २४,८८४, तिसºया सोमवारी २,४१,०४६, चौथ्या सोमवारी ३४,५५२, तर पाचव्या सोमवारी ३,०७,५८४ प्रवाशांनी नाशिक-त्र्यंबकदरम्यान बसने प्रवास केला.