शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय लाभार्थींसाठी ९० कोटी रुपये प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:49 IST

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला वैयक्तिक शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रु पये याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यासाठी विहित नमुन्यात ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : १२ हजारप्रमाणे अनुदान होणार वाटप

 

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला वैयक्तिक शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रु पये याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यासाठी विहित नमुन्यात ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणात शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यानंतर १२ हजार रु पयांचे अनुदान देण्यात येते. मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्णासह महाराष्ट् राज्य हगणदारीमुक्त घोषित करण्यात आलेले आहे. मात्र त्यावेळी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करता आलेले नाही. याबाबत ग्रामपंचायतींकडूनही सातत्याने अनुदानाबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार केंद्र शासनाचा ६३ कोटी, तर राज्य शासनाचा २७ कोटी असा एकूण ९० कोटींचा निधी शौचालय अनुदान वितरणासाठी जिल्ह्णास प्राप्त झाल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.लाभार्थ्यांना पंचायत समितीकडून किंवा ग्रामपंचायतीकडून थेट त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार असून, सदरचे तसेच पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत येथे याबाबत संपर्क साधून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तत्काळ अनुदान वितरण करा : साकोरेसन २०१२ च्या सर्वेक्षणात पात्र असलेल्या व शौचालय बांधून त्याचा वापर करणाºया सर्व कुटुंबांना ३१ जानेवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्याच्या सूचना राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहुल साकोरे यांनी दिल्या आहेत.नाशिक जिल्ह्णातील स्वच्छ भारत अभियानाच्या कामाबाबत राहुल साकोरे यांनी बैठक घेऊन विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. २०१२ च्या सर्वेक्षणात सुटलेल्या कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याची माहिती केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली आहे. ४या लाभार्थ्यांनीही शौचालय बांधल्यानंतर त्यांना शासनाकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी राहुल साकोरे यांनी दिली.