महासत्तेचे स्वप्न साकार करावे : अविनाश शिरोडे
By Admin | Updated: October 17, 2015 23:49 IST2015-10-17T23:46:21+5:302015-10-17T23:49:01+5:30
महासत्तेचे स्वप्न साकार करावे : अविनाश शिरोडे

महासत्तेचे स्वप्न साकार करावे : अविनाश शिरोडे
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण तारांगण येथे जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी इस्त्रोचे निवृत्त वैज्ञानिक तथा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगचे माजी अध्यक्ष अविनाश शिरोडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध अनुभव सांगितले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिरोडे यांनी वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्याच्या सूचना करतानाच अब्दुल कलाम यांना अपेक्षित २०२० भारताचे स्वप्न साकार करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जागतिक पातळीवरील कार्यक्रमाची दखल घेत युनायटेड नेशन आॅर्गनायझेशन (युनो) यांनी २०१० साली १५ आॅक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते; परंतु भारतात मात्र याचे महत्त्व अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर अधोरेखित झाले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून मोठ्या प्र्रमाणात साजरा करण्यात आल्याचे अपूर्वा जाखडी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. गुरुवारी दिवसभर झालेल्या कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तारांगणात आयोजित उपक्रमांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांना आकाशदर्शन घडवले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग या संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमास मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगचे विजय बाविस्कर, अपूर्वा जाखडी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)