नाशिकच्या विकासाची खरी जबाबदारी
By Admin | Updated: November 8, 2014 00:52 IST2014-11-08T00:51:33+5:302014-11-08T00:52:10+5:30
नाशिकच्या विकासाची खरी जबाबदारी

नाशिकच्या विकासाची खरी जबाबदारी
नाशिक- महापालिकेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महापालिकेत येणारे पदाधिकारी, नगरसेवक हे तात्पुरते असतात. त्यामुळे नाशिकच्या विकासाची खरी जबाबदारी ही पालिकेत कायमस्वरूपी काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहे. त्यांना आम्ही पदाधिकारी साथ देऊच; परंतु त्यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करावे, असे आवाहनही महापौरांनी केले. शहरातील वाढती अस्वच्छता आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव यावर चिंता व्यक्त करीत महापौरांनी नागरिकांना शहर स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. येत्या १९ तारखेला धर्माधिकारी प्रतिष्ठानचे १५ हजार कार्यकर्ते नाशिक शहर स्वच्छ करण्यासाठी शहरात येणार असून, त्यांना साथ देत नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शहर स्वच्छतेबाबत आयुक्त सोनाली पोंक्षे यांनीही नागरिकांना घंटागाडीचाच वापर करण्याचे आवाहन केले. उपमहापौर बग्गा यांनीही स्वच्छतेचे आवाहन केले. यानंतर महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यात विविध विभागांतील सुमारे ३१ मंडळांना पारितोेषिके देऊन गौरविण्यात आले. त्यात संपूर्ण शहरातून स्वराज्य सोशल ग्रुप (प्रथम), मातोश्री फ्रेंड सर्कल (द्वितीय), संभाजी मित्रमंडळ (उत्तेजनार्थ) यांना गौरविण्यात आले. गणेश विसर्जन काळात मूर्तिदान आणि निर्माल्य संकलनात सहभागी झालेल्या सुमारे ३५ व्यक्ती आणि संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अण्णा लकडे, नेताजी भोईर, विनायकदादा पाटील, ज्ञानेश सोनार, मधुकर कावळे, मधुकर झेंडे यांचा सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर गटनेत्या कविता कर्डक, दामोदर मानकर, संजय चव्हाण, यशवंत निकुळे, संदीप लेनकर यांसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)