वाचन हेच प्रगतीचे सोपे साधन - दिलीप धोंडगे

By Admin | Updated: October 18, 2015 22:14 IST2015-10-18T22:13:43+5:302015-10-18T22:14:48+5:30

वाचन हेच प्रगतीचे सोपे साधन - दिलीप धोंडगे

Reading is a very easy tool for progress - Dilip Dhondge | वाचन हेच प्रगतीचे सोपे साधन - दिलीप धोंडगे

वाचन हेच प्रगतीचे सोपे साधन - दिलीप धोंडगे

नाशिकरोड : वाचनामुळे विचार जागृत होतात, विचारांमुळे आचार होतात व आचारानेच व्यक्ती व देशाची प्रगती होते. वाचन हे प्रगतीचे सोपे साधन आहे, असे प्रतिपादन केटीएचएमचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.
स्वर्गीय माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे दहावीच्या परीक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी बोलताना प्राचार्य धोंडगे म्हणाले की, ज्या देशात ग्रंथाचे पारायण होते तो देश नेहमीच प्रगतिपथावर असतो. ग्रंथ हे समाजसुख आहे, असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणत असत. तर वाचनासारखा उत्तम खाऊ नाही, असे विनोबा भावे म्हणत असत असे धोंडगे यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षस्थानी उन्मेष गायधनी व प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, दत्ता गायकवाड, संदीप कोकाटे, मधुकर गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जयश्री कासार, काजल सोनवणे, दीपाली घोलप, साक्षी पगारे, पल्लवी शिंदे, पूजा घुगे, दीपाली घोलप, ऋतुजा रिठे, अर्पिता माळोदे, पूजा सानप, धनंजय मुठाळ, प्रगती कांडेकर, अकिंता जाचक, अंकिता राजोळे, सृष्टी दुसाने, मोनिका गोडसे, अनुराधा नागरे, अनुराधा नागरे, प्रणिती शिराळ, कावेरी आष्टेकर आदि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रमेश औटे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी दापोरकर व आभार सुरेखा गणोरे यांनी मानले. यावेळी रवींद्र मालुंजकर, राहुल बोराडे, दशरथ लोखंडे, विश्वास गायधनी, विष्णुपंत गायखे, प्रशांत केंदळे उपस्थित होते.

Web Title: Reading is a very easy tool for progress - Dilip Dhondge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.