महिला बालकल्याण सभा इतिवृत्त वाचनापुरता

By Admin | Updated: April 23, 2015 23:32 IST2015-04-23T23:31:42+5:302015-04-23T23:32:04+5:30

महिला बालकल्याण सभा इतिवृत्त वाचनापुरता

To read the Women's Child Welfare Meeting | महिला बालकल्याण सभा इतिवृत्त वाचनापुरता

महिला बालकल्याण सभा इतिवृत्त वाचनापुरता

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा गुरुवारी बोलाविण्यात आली; परंतु केवळ इतिवृत्त वाचनापलीकडे अन्य एकही विषय पटलावर न आल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती रंजना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती; परंतु विषयपत्रिकेवर केवळ इतिवृत्त मंजुरीचा विषय असल्याने सदस्यांचा पारा चढला. बैठकीला आयुक्त हजर राहत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच गेल्या तीन वर्षांपासून समितीला प्रकल्प अधिकारी नसल्याने कामे होत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांना सभेसाठी पाचारण करण्यात आले.
चव्हाण यांनी सभेचा नूर ओळखून प्रकल्प अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. या समितीकडे कोणतेही ठोस प्रस्ताव पाठविले जात नाहीत, त्यामुळे समितीने यापूर्वी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: To read the Women's Child Welfare Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.