विकास पर्वच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावे

By Admin | Updated: June 12, 2016 22:58 IST2016-06-12T22:57:39+5:302016-06-12T22:58:46+5:30

सानप : भाजपा कार्यकर्ता मेळावा

To reach the masses through the development of the mountain | विकास पर्वच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावे

विकास पर्वच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावे

 सिडको : महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने पाच वर्षांत शहराचे नंदनवन न करता अधोगतीला नेले असून, विकास पर्वच्या माध्यमातून मोदी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावी, तसेच मनपावर भाजपाचा ध्वज फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले.
सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात आगामी येऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपा सिडको मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे, युवा मोर्चा अध्यक्ष मुकेश शहाणे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सानप बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार अपूर्व हिरे, सीमा हिरे, विजय साने, महेश हिरे, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी मंडल अध्यक्ष जगन पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक अलका अहिरे आदि उपस्थित होते. यावेळी सानप म्हणाले की, केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असून, येत्या मनपा निवडणुकीतही शंभरहून अधिक नगरसेवक निवडूून आणून महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकवावा. तसेच सत्तेत असलेल्या पक्षाकडून कुंभमेळा यशस्वी केल्याचे सांगण्यात येत असले तरी यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यानेच कुंभमेळा यशस्वी झाल्याचेही सानप यांनी सांगितले. यावेळी वसंत गिते म्हणाले की, येत्या मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळी सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, डॉ. अपूर्वा हिरे आदिंनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन माणिक मेमाणे यांनी केले. आभार मुकेश शहाणे यांनी मानले. कार्यक्रमास रवि पाटील, अमोल पाटील, शेखर निकुंभ, प्रकाश अमृतकर, नगरसेवक बापू सोनवणे, संजय नवले, कैलास अहिरे, डॉ. मंजूषा दराडे,
गणेश अरिंगळे आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: To reach the masses through the development of the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.