मूर्ती संकलनातून पुनर्वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:45 IST2017-08-27T00:45:54+5:302017-08-27T00:45:59+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककर सातत्याने पुढाकार घेत आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग असून, अशीच ‘एक आपलं पर्यावरण’ ही संस्थादेखील मूर्ती संकलनातून पुनर्वापराला चालना देण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून करत आहे. मूर्तींचे एका खड्ड्यात विघटन न करता मूर्तिकारांना संकलित केलेल्या मूर्ती पुनर्वापराच्या निकषावर मोफत देण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

मूर्ती संकलनातून पुनर्वापर
नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककर सातत्याने पुढाकार घेत आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग असून, अशीच ‘एक आपलं पर्यावरण’ ही संस्थादेखील मूर्ती संकलनातून पुनर्वापराला चालना देण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून करत आहे. मूर्तींचे एका खड्ड्यात विघटन न करता मूर्तिकारांना संकलित केलेल्या मूर्ती पुनर्वापराच्या निकषावर मोफत देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आपलं पर्यावरण संस्था वृक्षलागवड व संवर्धनासह पक्षी संवर्धनासाठी शहरासह जिल्ह्यात परिचित आहे; याबरोबरच पर्यावरणपूरक सण-उत्सवाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, हेदेखील संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे २००८ सालापासून संस्थेने अनंत चतुर्दशीला मूर्ती संकलन करण्यास सुरुवात केली. तपोवनातील कपिला रामसृष्टी उद्यानाजवळ संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड व स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केला. पहिल्या वर्षी संकलित झालेल्या मूर्तींचे परिसरातील पडीक विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आले; मात्र २००९-१०पासून पडीक विहिरी संपुष्टात आल्यामुळे संकलित गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे कोठे अन् कसे? हा प्रश्न निर्माण झाला. खड्डा करून पीओपीच्या मूर्ती विसर्जित करत मातीचे प्रदूषण करण्यापेक्षा संकलित मूर्तींचा पुनर्वापर क रण्याची संकल्पना गायकवाड यांना सुचली. त्यानुसार संकलित मूर्ती संबंधित काही मूर्तिकारांना मोफत देण्याचे ठरविले. काहीमूर्तिकारांनी संकलित मूर्ती घेण्यास तयार झाले. मागील आठ वर्षांपासून संस्थेचा मूर्ती संकलनातून पुनर्वापराचा प्रयत्न सुरूच आहे.
‘देव जुना होत नाही, तर भावना जुन्या होतात...’ हे पटवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. पुनर्वापराच्या माध्यमातून प्रदूषणाबरोबरच मूर्तींची विटंबना थांबते. तसेच नव्याने बाजारात येणाºया पीओपीला आळा बसतो, असे गायकवाड म्हणाले. नदी, मातीचे प्रदूषण टळण्यास मदत होत असून, गणेशभक्तांचाही या संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे.