शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रतेनंतर निवाणेच्या सरपंचपदासाठी पुन्हा मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:30 IST

२६ सप्टेंबरला निवडणूक : अपत्यामुळे पदावरुन पायउतार

ठळक मुद्देनामनिर्देशनपत्रात दोनच अपत्य असल्याची खोटी माहिती दिली होती

कळवण - दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्ररीनुसार निवाणे ग्रामपंचायतीचे सरपंच केदा शिवाजी सोनवणे यांचे सदस्यत्व रद्दबातल होत त्यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आता पोटनिवडणूक लागली असून येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.सन २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत केदा शिवाजी सोनवणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी नामनिर्देशनपत्रात दोनच अपत्य असल्याची खोटी माहिती दिली होती. याबाबत राजेंद्र आहेर यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रर करून दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचे पुरावे सादर केले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडील सुनावणीत राजेंद्र आहेर यांच्या तक्ररीनुसार तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणास्तव केदा सोनवणे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी दिला. त्यामुळे तत्कालीन सरपंच असलेल्या केदा शिवाजी सोनवणे यांचे सरपंचपद रद्द ठरविले होते. आता या पदासाठी थेट जनतेतून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.निवडणूक कार्यक्र मरिक्त झालेल्या सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे. यासाठी दि ५ ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजता सार्वजनिक सुट्टी वगळता इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दि १२ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून छाननी होणार आहे. दि १५ सप्टेंबर रोजी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. तसेच त्याच दिवशी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दि २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेदरम्यान मतदान घेण्यात येणार असून दि २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल .

टॅग्स :Nashikनाशिकsarpanchसरपंच