हतबद्ध यंत्रणेत पुन्हा भरले बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:30+5:302021-04-23T04:16:30+5:30

नाशिक : रुग्णालयातील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठाच ठप्प झाल्याने सर्वत्र अनागोंदी माजली होती, अशाप्रसंगी पर्यायी कोणताच ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध नसल्याने ...

Re-energize the helpless system! | हतबद्ध यंत्रणेत पुन्हा भरले बळ !

हतबद्ध यंत्रणेत पुन्हा भरले बळ !

नाशिक : रुग्णालयातील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठाच ठप्प झाल्याने सर्वत्र अनागोंदी माजली होती, अशाप्रसंगी पर्यायी कोणताच ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध नसल्याने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयसह सारी यंत्रणाच हतबल झाली होती. या आपत्कालीन परिस्थितीमुळे एकाचवेळी अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याने कर्तव्यावर असलेल्या अनेक नर्सेसदेखील बुधवारी भांबावल्या, सुन्न झाल्या होत्या. त्या सर्वांना पुन्हा मानसिक बळ देत रुग्णालयाची सर्व यंत्रणा सुरळीतपणे कार्यान्वित करण्याचे मोठे आव्हान रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी पार पाडावे लागले.

काही रुग्णांसाठी आठवडाभरापासून तर काही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयातील सर्व यंत्रणा जिवापाड मेहनत घेत होती. रुग्णांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसनादेखील त्या आपत्कालीन परिस्थितीची अजिबात कल्पना नव्हती. मात्र, अचानकपणे ऑक्सिजन लिक झाल्यानंतर कर्तव्यावर असलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉयची यंत्रणा प्रचंड धावपळ झाली. सारी यंत्रणाच हतबल झाली होती. डॉक्टर आणि नर्स समोर उपस्थित असतानाही रुग्ण जीव सोडू लागल्याने वैद्यकीय यंत्रणादेखील हतबद्ध झाली होती. मात्र, मंगळवारी दुर्घटनेनंतर यंत्रणा मनावर नियंत्रण ठेवून कार्यरत होती.

इन्फो

बुधवारी सकाळी पुन्हा मंगळवारचा स्टाफ ड्यूटीवर आल्यानंतर प्रमुख डॉक्टरांसह प्रशासन प्रमुखांनी त्यांच्याशी संवाद साधून पुन्हा नियमितपणे धैर्याने कामकाजाला लागण्याचे आवाहन केले. सर्व कर्मचाऱ्यांनीदेखील एकमेकांना धीर देत कामकाजास सुरुवात केली.

Web Title: Re-energize the helpless system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.