नामपूर प्रीमिअर लीग क्रि केट स्पर्धेत आरसीबी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:45 IST2019-01-11T16:45:35+5:302019-01-11T16:45:55+5:30
नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

बक्षीस वितरित करताना डॉ. तुषार शेवाळे, जि.प. शिक्षण सभापती यतीन पगार.
नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळ्यास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, माजी सरपंच प्रमोद सावंत, पुष्पा मुथा, सोनाली निकम, डॉ. दिकपाल गिरासे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, भरत सावंत, विनोद शिरापुरी, जगदीश सावंत, एनपीएल निवड समितीचे अध्यक्ष अनिल सावंत आदी उपस्थित होते.
एनपीएल समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार झाला. विजेत्या संघास एनपीएल चषक प्रथम क्र मांकाचे बक्षीस डॉ. तुषार शेवाळे यांनी दिले, तर द्वितीय पारितोषिक सभापती यतिंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आले. आगामी काळात एनपीएल स्पर्धेची व्याप्ती जिल्हास्तरापर्यंत वाढवावी असे आवाहन, डॉ. तुषार शेवाळे यांनी यावेळी केले. आरसीबी, प्रफुल्ल वॉरिअर्स, सोना इलेव्हन, बागलाण टायर्स, अजिंक्य टायगर्स, दादाज इलेव्हन अशा सहा टीम्सची निवड करण्यात आली. स्पर्धा काळात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले.