युवा सप्ताहातून युवकांच्या कलागुणांना वाव : रवींद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST2021-01-15T04:13:29+5:302021-01-15T04:13:29+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज ...

Rawindra Naik: Youth Week | युवा सप्ताहातून युवकांच्या कलागुणांना वाव : रवींद्र नाईक

युवा सप्ताहातून युवकांच्या कलागुणांना वाव : रवींद्र नाईक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर वावरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयात युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मविप्र समाजाचे संचालक नाना महाले, प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना सोनखासकर, हेमांगी पाटील, डॉ. मीनाक्षी गवळी, डॉ. दर्शन कोकाटे, प्रा. रविराज वटणे, प्रा. एस. टी. घुले, प्रा. दीपक दळवी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी हेमंत काळे, मीना गायकवाड, पूनम गोसावी या युवकांचा भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. टी. घुले यांनी केले तर आभार प्रा. दर्शन कोकाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. दीपक दळवी, गणपत गडाख, बापू बागुल, हेमंत काळे, प्रभाकर गांगुर्डे, वैभव खंडागळे, धनंजय कदम, ऋतिक पाटील, राहुल चौधरी, पूनम गोसावी, शिवानी मुळे आदी उपस्थित होते.

Web Title: Rawindra Naik: Youth Week