पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी रवींद्र अभिमन्यू वाघ व उपसभापतिपदी सुनील मोतीराम जाधव यांची निवड करण्यात आली. सुनील रामचंद्र जाधव, अशोक जाधव व राहूल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी कैलास सोनवणे व सचिव रामदास बहिरम यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. (वार्ताहर)
पिळकोस सोसायटीच्या सभापतिपदी रवींद्र वाघ
By admin | Updated: October 25, 2016 00:22 IST