त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाचा कार्यभार रवींद्र सोनवणे यांच्याकडे
By Admin | Updated: April 6, 2015 00:42 IST2015-04-06T00:42:09+5:302015-04-06T00:42:36+5:30
त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाचा कार्यभार रवींद्र सोनवणे यांच्याकडे

त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाचा कार्यभार रवींद्र सोनवणे यांच्याकडे
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेच्या अध्यक्ष एक महिनाभर कौटुंबिक कारणास्तव रजेवर गेल्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष रवींद्र शांताराम ऊर्फ बाळा सोनवणे यांनी शनिवारी स्वीकारला. दि. १ एप्रिलपासूनच त्या रजेवर गेल्या आहेत. नगराध्यक्ष अलकाताई शिरसाट या एक महिना दीर्घ रजेवर गेल्या आहेत. पदग्रहण सोहळ्यास झालेल्या औपचारिक सोहळ्याप्रसंगी नागरी सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांच्या अध्यक्षतेखाली अनेक वक्त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. राजाभाऊ शिरसाट उपस्थित होते. यावेळी धनंजय तुंगार, संतोष कदम, ललित लोहगावकर, युवराज कोठुळे, पंकज धारणे, विशाल जोशी, अनघा फडके, विशाल जोशी, हरिभाऊ अंबापुरे, दिनेश पाटील, डॉ. दिलीप जोशी, भूषण अडसरे तर अध्यक्ष सुरेश गंगापुत्र आदिंनी भाषणे केली. सूत्रसंचालन पुरुषोत्तम कडलग यांनी केले. कार्यक्रमास राजाभाऊ शिरसाट, पुरुषोत्तम लोहगावकर, रवींद्र गमे, मुख्याधिकारी एन. एम. नागरे, संतोष कदम, दीपक लढ्ढा, तृत्पी धारणे, विजयाताई लढ्ढा, अमर सोनवणे, संजय हरळे, दत्तात्रय सोनवणे, अविनाश सोनवणे, जयवंताबाई सोनवणे, त्रिवेणी सोनवणे, शांताराम सोनवणे, रेखा सोनवणे, सुभाष सोनवणे, अविनाश सोनवणे, शकुंतला वाटाणे, सिंधुताई मधे, अंजनाबाई कडलग आदि नागरिक नगरसेवक उपस्थित होते.