रवि पगारे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार
By Admin | Updated: August 18, 2016 01:36 IST2016-08-18T01:35:24+5:302016-08-18T01:36:06+5:30
रवि पगारे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार

रवि पगारे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार
नाशिक : इंडिया इंटरनॅशनल फें्रड्सशिप सोसायटीच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी युगांतर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व श्यामराव विठ्ठल को-आॅप. बॅँकेचे संचालक रवि पगारे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात तामिळनाडूचे माजी राज्यपाल भीष्म नारायण सिंग यांच्या हस्ते रवि पगारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आसामचे माजी राज्यपाल सपतेर्जी सय्यद, टीनुशिया देशाचे राजदूत तारिक औझुझ, झारखंड विधानसभेचे सभापती दिनेश ओरोन, सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंग आदि उपस्थित होते.
रवि पगारे यांनी युगांतर सोशल फाउंडेशनची स्थापन करत आजवर विविध समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल देशपातळीवर घेतली जाऊन त्यांची गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गेल्या शनिवारी (दि.१३) सदर पुरस्काराचे वितरण झाले.