शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

रेव्ह पार्टी प्रकरण: तीन तासांच्या सुनावणीनंतर हीना पांचाळसह सर्वांना पुन्हा पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 11:46 PM

हिनासह अन्य संशयितांना कुठलाही दिलासा नाही

नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टीप्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह अन्य वीस संशयितांना इगतपुरी न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे मंगळवारी (दि.६) संध्याकाळी वर्ग केले. विशेष न्यायालयात संध्याकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर हिनासह अन्य संशयितांना कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने या सर्व संशयितांचा ताबा पुन्हा ग्रामीण गुन्हे शाखेला दिला. बुधवारी (दि.७) सकाळी या रेव्ह पार्टीशी संबंधित एकुण २५संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नाशिकमधील इगतपुरीत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकुण २२ तरुण तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. या दोन दिवसीय हवाईयन रेव्ह पार्टी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने कुणकुण लागताच गेल्या शनिवारी मध्यरात्री उधळून लावली होती. या छाप्यात पोलिसांनी अभिनेत्री हिना पांचालसह एकुण २२ संशयितांना स्काय ताज, स्काय व्हिला या बंगल्यांमधून रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी काही संशयितांविरुध्द प्रथमदर्शनी कोटपा, दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला तर काही संशयितांविरुध्द एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली.

दरम्यान, मंगळवारी या संशयितांना पुन्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश नाईक-निंबाळकर यांच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जोरदार युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन घेत सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत गुन्हे शाखेला या सर्व संशयितांना एका रात्रीकरिता ताबा दिला....असा झाला युक्तीवादपोलिसांच्या छापा पडला असता संशयितांनी बंगल्याच्या आवारातील स्विमींगपुलमध्ये चरस, कोकेनसारखे ड्रग्ज फेकून दिले.नायजेरीयन सराईत गुन्हेगार उमाही पीटर याच्याशी यांचा कसा संपर्क झाला? याचा तपास करावयाचा आहे.

सराईत गुन्हेगार पीटरचे दोन साथीदार अद्यापही फरार असून त्यांचाही शोध घेतला जात आहे. स्विमींग पुलमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज फेकले याची तपासणी करावयाची आहे, तसेच या सर्व संशयितांच्या रक्त, लघवीच्या नमुन्यांच्या चाचणीचा अहवालही प्रतिक्षेत आहे.

एनडीपीएसच्या गुन्ह्याच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे तालुका न्यायालयाकडून सर्व वीस संशयितांची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. संध्याकाळी साडे सात वाजता विशेष न्यायालयापुढे सुनावणीला प्रारंभ झाला. ही सुनावणी सव्वा नऊ वाजेपर्यंत चालली. साक्षीदारांच्या जबाबानुसार दोन दिवस संशयितांनी सतत अंमली पदार्थांचे सेवन केल्याची बाब पुढे आली आहे. या रेव्ह पार्टीसाठी किती प्रमाणात चरस, कोकेनसारखे अंमली पदार्थ आणले गेले? तसेच नायजेरियन गुन्हेगाराशी यांपैकी कोणाचा व कसा संबंध आला? अशा विविध महत्वाच्या बाबींचा तपास सुरु असल्याने न्यायालयाने पुन्हा ग्रामीण गुन्हे शाखेकडे संशयितांचा ताबा दिला. - अजय मिसर, विशेष सरकारी वकील

टॅग्स :Heena Panchalहिना पांचाळ