नाशिक : येथील पेठरोडवरील आदिवासी आश्रम शाळेत आदिवासी समाजाकडून रावणाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विजयादशमीच्या मुहूर्तावर आदिवासी समाजाकडून रावणाच्या प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा आहे. यानुसार येथील आदिवासी बचाव अभियान व अदिवासी संघटनांतर्फे ‘महात्मा रावण’ प्रतिमापूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आदिवासी नायक महात्मा रावणाची ताटी (दहा मुखधार मुखवटा) काढून पूजन करण्यात आले. पेठ रोडवरील शासकिय आदिवासी वसतीगृहापासून सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत रावण ताटी नृत्याने लक्ष वेधून घेतले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते.
आदिवासी आश्रम शाळेत रावणाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 13:55 IST