गिरणाकाठावर रावणदहन होणार
By Admin | Updated: October 3, 2014 01:19 IST2014-10-03T01:14:47+5:302014-10-03T01:19:57+5:30
गिरणाकाठावर रावणदहन होणार

गिरणाकाठावर रावणदहन होणार
मालेगाव : येथील शहराच्या पश्चिम भागात गिरणा काठावरील दसरा मैदानावर सलग दुसऱ्यावर्षी मोठ्या उत्साहात विजयादशमी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती विजयादशमी सेवा समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सायंकाळी जाजू कंपाउंड येथून प्रभु श्रीरामाची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर दसरा मैदानावर रावण दहन होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष संजय नेरकर यांच्यासह सोहन जैन, रमेश चौधरी, विजय चौधरी आदिंनी केले आहे.