सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू आला आहे. रेशन दुकानातील गहू माती मिश्रित व मोठ मोठे गोळे झालेला गहू आला असून त्यास जनावरेसुद्धा खाणार नाही इतका खराब गहू माणसांना खाण्यासाठी पाठविल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.सध्या साठ ते सत्तर टक्केच धान्य रेशन दुकानात येत असून ते पुरेसे होत नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत. सध्या दुष्काळ सदृश स्थिती असून आदिवासी भागात पुरेशा प्रमाणात गहू, तांदूळ व साखर नियमित पाठविणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाचा गव्हाचा पंचनामा करण्यासाठी दुकानदार तथा सरपंच बाळासाहेब घोरपडे यांनी तलाठी व सर्कल यांना बोलावले असता त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने त्यांच्याविषयी उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
रेशन दुकान निकृष्ट गहू
By admin | Updated: July 18, 2015 23:10 IST