Ration grains can be obtained only if there is a mask | मास्क असेल तरच मिळेल रेशनचे धान्य

मास्क असेल तरच मिळेल रेशनचे धान्य

ठळक मुद्देदुकानदारांची भूमिका: कोरोनाची लागण होण्याची भीती

नाशिक: रेशनचे धान्य वाटप करण्याची जबाबदारी असलेल्या रेशनधान्य दुकानदारांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करतानाच धान्य देतांना अंतर असावे म्हणून उपायोजना केलेल्या आहेत. मात्र बरेचसे ग्राहक मास्क वापरत नसल्याने दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले असून त्यांनी ‘नो मास्क, नो रेशन’ अशी भूमिका घेतली आहे.

कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेत दुकानदारांना अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे. रेशन घेण्यासाठी येणाऱ्यांना धान्य देण्यासाठी पॉझ मशीनवर बोटाचे ठसे घेतले जातात. यासाठी दुकानदार आणि ग्राहक यांचा जवळून संपर्क येतो. त्यामुळे ग्राहकांनी देखील खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांकडून निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने त्यामुळे दुकानदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेशनदुकानदारांना कोरोनाची बाधा झालेली आहे तर जवळपास ३० दुकानदारांना जीव गमवावा लागलेला आहे.

अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदारांचा रोज शेकडो नागरिकांशी संपर्क येतो. करोनाचा धोका आता रेशन दुकानदारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. दुकानदरांनी सुरूवातीलाच विमा संरक्षण देण्याची मागणी केलेली होती. कोविडमध्ये शासनाकडून अन्नधान्याची तजवीज केली मात्र ज्या रेशनदुकानांच्या माध्यमातून शासनाजी योजना राबविली जाणार आहे. त्या घटकाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिलेले नसल्याने दुकानदारांनीच स्वता: ची काळजी घ्यावी असे आवाहन समितीकडून करण्यात आलेले आहे.

रांगेत उभे राहताना तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टनन्स न पाळणे, असे प्रकार होत असल्याने यापुढे आता ग्राहकांनी तोंडाला मास्क न लावल्यास लाभार्थ्यांना रेशन दिले जाणार नाही असा पवित्रा रेशन दुकानदारांनी घेतला आहे.

रेशनदुकानदार असुरक्षित वातावरणात शासनाच्या योजनेचे अन्न्नधान्य वाटप करीत आहे. जिल्'ात अनेक रेशनदुकानदार कोरोनाबाधित झालेले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ग्राहकांनीही सुरक्षितता राखली पाहिजे. तोंडाला मास्क नसेल तर यापुढे संबंधित ग्राहकाला धान्य दिले जाणार नाही.

- - निवृती कापसे, जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा रास्त भाव संघटना

 

Web Title: Ration grains can be obtained only if there is a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.