एकाच दिवसात मिळाल्या शिधापत्रिका
By Admin | Updated: August 2, 2014 01:21 IST2014-08-02T01:05:15+5:302014-08-02T01:21:44+5:30
एकाच दिवसात मिळाल्या शिधापत्रिका

एकाच दिवसात मिळाल्या शिधापत्रिका
नाशिक : राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती अभियानाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जुन्या नाशकातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये पार पडला. यावेळी एकाच दिवसात शिधापत्रिका देण्याबरोबरच अन्य कामे पुरवठा विभागाने केली.
राज्य शासनाच्या या उपक्रमाचे नगरसेवक रंजना पवार आणि विनायक खैरे यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या काही विभागांशी संबंधित समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात आले. विशेषत: नवीन शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, पत्रिकेत नाव वाढविणे अथवा कमी करणे, दुकान व पत्त्यात बदल करणे यांसह विविध अर्ज तत्काळ निकाली काढण्यात आले. या कायर्क्रमात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटनेत्या प्रा. कविता कर्डक, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ, धान्य वितरण अधिकारी उजागरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी उदय कुलकर्णी, पवार, डेबे, नाना पवार, गोरख चहाळे, राया गायकवाड, कल्पेश कर्वे, सागर बेदरकर, धर्मराज काथवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)