हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव

By Admin | Updated: November 25, 2015 23:08 IST2015-11-25T23:06:55+5:302015-11-25T23:08:20+5:30

परंपरा : त्रिपुरा वाती प्रज्वलित करण्यासाठी महिलांची गर्दी

Rathotsav in the presence of thousands of devotees | हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव

हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव

त्र्यंबकेश्वर : शतकांची परंपरा असलेला त्र्यंबकराजाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुकुट १५० वर्षांपूर्वीच्या ३१ फूट उंच शिसवी लाकडापासून बांधलेल्या आकर्षक रंगसंगतीची पुष्प सजावट केलेल्या रथातून तीर्थराज कुशावर्ताकडे प्रस्थान करता झाला.
मंगल वाद्याच्या गजरात शंख, तुतारीच्या निनादात अग्रभागी त्र्यंबकराजाची पालखी होती. रथमार्गावर नागरिकांनी सडासंमार्जन करून फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. रथावर इमारतीच्या सज्जातून पुष्पवृष्टी केली जात होती.
मंदिर चौकातील ज्योतिर्लिंग मंडळ, लक्ष्मीनारायण चौक मित्रमंडळ, अशा मंडळांनी रथयात्रेचे स्वागत रांगोळ्यांनी केले होते. रथ कुशवर्तावर स्रान पूजेकरिता दाखल झाला तोपर्यंत पुन्हा त्याच मार्गावर नव्याने फुलांचे गालिचे करण्यात युवक-युवतीची झुंबड उडाली होती. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, विष्णू गाजरे, जयंत शिखरे, सुरेश गंगापुत्र, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, पोलीस निरीक्षक देवीदास पाटील, भाजपा उपाध्यक्ष श्याम गंगापुत्र, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
मंदिर परिसरात त्रिपुरा वाती प्रज्वलित करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. नागरिकांनी शहरात पेढे वाटून हा उत्सव साजरा केला.

Web Title: Rathotsav in the presence of thousands of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.