श्रीराम व गरुडाची रथयात्रा
By Admin | Updated: April 1, 2015 01:23 IST2015-04-01T01:22:54+5:302015-04-01T01:23:33+5:30
श्रीराम व गरुडाची रथयात्रा

श्रीराम व गरुडाची रथयात्रा
पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘महारुद्र पवनसूत हनुमान की जय’ असा रामनामाचा जयघोष करून रामनवमीनिमित्त कामदा एकादशीला श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून सायंकाळी श्रीराम व गरुडाची रथयात्रा पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. नाशिकच्या या ग्रामोत्सवात रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी सहा वाजता काळाराम मंदिरात रामाच्या पादुका व भोगमूर्तींची सभामंडपातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आल्यानंतर उत्सवाचे मानकरी संदीपबुवा पुजारी यांच्या हस्ते पादुका आणि भोगमूर्तींचे पूजन व आरती करण्यात आली. बुवांच्या हस्ते रथात मूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर गरुडरथाचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी यांच्या हस्ते मानाचे श्रीफळ वाढविण्यात येऊन दोन्ही रथ एका रांगेत उभे करण्यात आले. यावेळी रथ ओढणाऱ्या रास्ते आखाडा तालीम संघ आणि अहल्याराम व्यायामशाळा व पाथरवट समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मानाचे गंध लावून सत्कार करण्यात आला आणि दोन्ही रथांच्या पुढे रामाची सवाद्य पालखी निघाली.