शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

माजी खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको

By संजय पाठक | Updated: July 8, 2024 17:34 IST

शिंदे सेनेचा सरकारला घरचा आहेर!

संजय पाठक, नाशिक- सध्या नाशिक ते मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विधिमंडळात आवाजही उठवण्यात आला असला तरी अद्याप रस्त्याच्या अवस्थेत कोणती सुधारणा झालेली नाही त्यामुळे शिंदे सेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक शहराजवळ विल्होळी येथे मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने हेमंत गोडसे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. 

नाशिक- मुंबई महामार्गाची शहापूर ते ठाणे दरम्यान दुरवस्था झाली असून दहा- दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत तसेच अपघातही होत आहेत मात्र सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून अनेक ठिकाणी पूल उभारले जात आहेत त्यामुळे हे  काम संथगतीने सुरूच आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या अवस्था बिकट असताना देखील टोल आकारणी केली जात आहे. त्यामुळे आज शिंदे सेनेच्या वतीने माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विल्होळी जवळ महामार्ग रोखून धरल्याने सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात खड्डे बुजवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सदानंद नवले, नाशिक तालुकाध्यक्ष लकी ढोकणे, बाळासाहेब लांबे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेNashikनाशिकShiv Senaशिवसेना