शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जंगली झुडुपांची पडणार भर : ‘वनराई’त नाशिककर साजरा करणार वृक्षांचा ‘बर्थ-डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:58 IST

येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे.

ठळक मुद्देझाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहनसंवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’

नाशिक : ‘जागतिक पर्यावरण दिन’ अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन केले आहेत. त्यापैकी एक आपलं पर्यावरण संस्था. ही संस्था मागील पंधरा वर्षांपासून शहर व परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. या संस्थेने गेल्या चार ते पाच वर्षांपासून शहरात दरवर्षी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत आगळा वेगळा ‘वनमहोत्सव’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नाशिककरांमध्ये वृक्ष लागवड, संवर्धनाविषयीची जनजागृती तर होतच आहे; मात्र पर्यावरण संवर्धनाची आवडही निर्माण होत आहे. येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी नाशिककर पुन्हा सज्ज झाले आहेत.आपलं पर्यावरण संस्थेने शहरात २०१५ साली सातपूर येथील वनविभागाच्या जागेत नाशिक पश्चिम वनविभागाच्या परवानगीने व पुढाकाराने ‘नाशिक देवराई’ संकल्पना राबविण्याचे ठरविले. येथील सुबाभूळ, ग्लिरिसिडीयाचे मृत जंगल जीवंत करण्याचे मोठे आव्हान या संस्थेने स्विकारले. फाशीचा डोंगर या नावाने ओळखली जाणारी ही जागा आता ‘नाशिक देवराई’ म्हणून नावारूपाला आली आहे. येथे अकरा हजार भारतीय प्रजातीची रोपांची दमदार वाढ झाली असून गेल्या वर्षीय दुर्मीळ रानवेलींची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती. याच धर्तीवर म्हसरूळ येथील वनविभागाच्या जागेत संस्थेने सहा हजार झाडांची लागवड २०१६ साली करून वनमहोत्सव साजरा केला. या ठिकाणी ‘नाशिक वनराई’ विकसीत करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न आहे. यंदा वनराईमध्ये भर टाकली जाणार आहे, ती म्हणजे दुर्मीळ अशा २५ ते ३० प्रजातीच्या जंगली झुडुपांची. या प्रजातींची सुमारे सहाशेहून अधिक रोपांची लागवड पर्यावरणदिनाच्या औचित्यावर केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेचे हे दोन्ही प्रकल्प यशस्वी झाले असून वैयक्तिक गायकवाड हे याबाबत लक्ष देऊन आपल्या हरित सैनिकांच्या मदतीने त्यासाठी प्रयत्नशील आहेत. वृक्ष संवर्धन करताना बदलत्या ऋुतुचक्रानुसार येणाऱ्या विविध अडचणी नवनवीन आव्हानांचा सामना करत त्यांची टीम संयम बाळगून रोपांच्या संवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’ करत आहेत.केवळ वृक्षारोपण करून लावलेली वृक्ष वा-यावर सोडून देणे हा या संस्थेचा मुळीच उद्देश नाही, तर लावलेली रोपे जगणार कशी आणि त्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर कसे होईल, यादृष्टीने संस्थेचे सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवडीमागे जैवविविधतेची जोपासना हा मुख्य उद्देश आहे. विविध प्रकारच्या किटकांपासून पक्ष्यांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत जैवविविधता जोपासली जावी, या दृष्टीने रोपांची लागवड आणि संगोपनावर संस्थेकडून भर दिला जात आहे. भविष्यात हे दोन्ही प्रकल्प निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींकरिता अभ्यासाचे सुसज्ज असे केंद्र व्हावे, असा मानस गायकवाड यांनी बोलून दाखविला.झाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहनयेत्या बुधवारी साजरा होणाºया वनमहोत्सवांतर्गत नाशिककरांनी वनराईवर हजेरी लावताना आपल्या लाडक्या झाडांना न विसरता त्यांच्या गरजेचे ‘गिफ्ट’ आणण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. ‘गिफ्ट’ची कल्पनाही अत्यंत भन्नाट आहे, ती म्हणजे येताना पाच लिटर पाण्याचे कॅन अन् शक्य झाल्यास गांडुळ किंवा कंपोस्ट खताची लहानशी बॅग.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरणforest departmentवनविभाग