शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल सहा वर्षे बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:09 IST

नाशिक : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवनातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्ष या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी नाशिकला परतल्यानंतर याचा उलगडा झाला असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित संगीता होंडे (रा़विहितगाव, देवळाली कॅम्प) या महिलेला अटक करण्यात आली आहे़

ठळक मुद्देमुलींचे अपहरण करणारी टोळीमैत्रिणीच्या आईनेच केले अपहरणसंशयित महिलेस अटक

नाशिक : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवनातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्ष या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी नाशिकला परतल्यानंतर याचा उलगडा झाला असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित संगीता होंडे (रा़विहितगाव, देवळाली कॅम्प) या महिलेला अटक करण्यात आली आहे़

पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या फियार्दीनुसार २०१२ मध्ये ती आईसमवेत नांदूर नाका परिसरात राहत होती़ शेजारी राहणारी तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित नंदा जाधव हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले व गुंगी आल्याचे लक्षात आल्यानंतर एका रिक्षात टाकून संशयित मंगला या महिलेकडे सोडून दिले. मंगलाने महिनाभर एका खोलीत कोंडून नंतर या मुलीस पूजा नावाच्या महिलेकडे पाठविले.

तेथून संशयित संगीता, रंजना, राजू व संजय, विनोद यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावी नेले़ या ठिकाणी संजयसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले़ यानंतर पिडीत मुलीला संशयित संजयकडून प्रतिदिन मारहाण तसेच सन २०१२ ते २२ सप्टेंबर २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत बलात्कार केला. संजय त्याचा भाऊ विनोदया दोघांनीही या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून या मुलीने दोन मुलांनाही जन्म दिला आहे़

पीडित मुलीने विवाह झालेल्या संशयित संजय यास रक्षाबंधनासाठी आईकडे जाण्याचा हट्ट धरला़ त्यानुसार त्याने देवळाली कॅम्प येथून खरेदी केलेल्या महिलेकडे पिडीतेला आणले व एक दिवस मुक्कामही केला़ त्यानंतर पुन्हा परतीस निघाला असता पिडीतेने मनमाड रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरून घेतल्याने २४ आॅगस्टला या मुलीला तिच्या आईकडे सोडून फरार झाला़

या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदा जाधव, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद या आठ संशयितांविरोधात अपहरण, बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हे प्रकरण गुंतागुंतीचे असून, तपास झाल्यावर सत्य उजेडात येइल अशी माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली़पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखलपिडीत मुलीला घरी सोडल्यानंतर तिची आई व नातेवाईक संशयितांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले होते़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-यांनी गुन्हा नोंदवून न घेता आपसात प्रकरण मिटविण्याचा सल्ला देत मुलीला व तिच्या नातेवाईकांनाच दमबाजी केली़ याबाबत अत्याचार विरोधी कृती समितीचे राहुल तुपलोंढे व कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल यांची सोमवारी (दि़१७) भेट घेत परिस्थिती समजावून सांगितली़ यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर आडगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस