पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: January 14, 2016 00:19 IST2016-01-14T00:19:13+5:302016-01-14T00:19:13+5:30

पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

Rape with the father and his three | पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

निफाड : तालुक्यातील करंजी शिवारात पित्यानेच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर अन्य तिघा नराधमांनीदेखील तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. यातील एका संशयित तरुणाने या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचे उघड झाले आहे. यातील तिघा संशयितांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे, तर चित्रीकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बालगृहात पाठविण्यात आले आहे. बलात्कारी पिता अद्यापही फरार आहे.
सदर पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती आपल्या गावाहून २२ डिसेंबर रोजी कावीळ उतरविण्यासाठी आपल्या पित्यासमवेत गेली होती. तेथून परतताना करंजी शिवारातील एका नाल्यात सकाळी साडेआठच्या सुमारास पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला. मात्र ही घटना चौघा तरुणांनी पाहिल्यानंतर दमदाटी करत त्यातील तिघांनी त्या मुलीवर बलात्कार केला. या प्रसंगाचे चौथ्या संशयिताने मोबाइलव्दारे चित्रीकरण केले. त्यानंतर चौघांनी त्या मुलीला धमकी देत करंजीच्या दिशेने पळ काढला. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी याबाबत विचारणा करताच तिने घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार सायखेडा पोलीस ठाण्यात पित्यासह संशयित मंगेश तांबेकर (१९), सुकदेव तांबेकर (२५), उद्धव अडसरे (२३) व अल्पवयीन विकास शिंदे (१७) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी वेगाने तपास करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एकास बालसुधारगृहात पाठविण्यात आले. संशयित नराधम पिता फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Rape with the father and his three