रास्ता रोकोने नागरिक वेठीस
By Admin | Updated: September 15, 2015 23:51 IST2015-09-15T23:50:59+5:302015-09-15T23:51:28+5:30
चक्काजाम : वाहतूक कोंडीने मनस्ताप

रास्ता रोकोने नागरिक वेठीस
नाशिक : सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक देत कुंभनगरीची ‘द्वारका’ अडविली. याचा फटका सकाळी बाहेर पडलेल्या नोकरदार नाशिककरांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रलंबित मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली द्वारका, लेखानगर, अमृतधाम येथे रास्ता रोको केला. यावेळी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर आले अन् ठिय्या मांडल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले.
सर्व कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वर्गणी काढून मदतनिधी उभारला असता, तर कदाचित या राजकीय पक्षाची जनमानसात प्रतिमा उंचावण्यास मदत झाली असती आणि असे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलनादरम्यान, रुग्णवाहिकादेखील कोंडीत सापडल्या होत्या. (प्रतिनिधी)