रणधुमाळी : नगरसेवकाच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात; प्रचारात वाढली चुरस त्र्यंबकला रंगणार अटीतटीच्या लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:12 IST2017-11-30T23:44:33+5:302017-12-01T00:12:00+5:30
येथील नगर परिषदेच्या निवडणूक आखाड्यात चिन्हे वाटपानंतर आता अधिक चुरस निर्माण झाली असून, नगरसेवकपदासाठीच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.

रणधुमाळी : नगरसेवकाच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात; प्रचारात वाढली चुरस त्र्यंबकला रंगणार अटीतटीच्या लढती
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या निवडणूक आखाड्यात चिन्हे वाटपानंतर आता अधिक चुरस निर्माण झाली असून, नगरसेवकपदासाठीच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.
यातील बहुतेक लढती लक्षणीय आणि चुरशीच्या होणार आहेत. त्यामुळेच त्या रंगतदार होतील, यात शंका नाही. प्रभाग क्र . ८ मध्ये अ, ब, क या तिन्हीही वॉडर््समध्ये दुरंगी लढती होणार आहेत. काही प्रभागात तिरंगी, तर काही प्रभागात चौरंगी लढती होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यामध्ये आघाडी न झाल्याने त्याचा लाभ अन्य पक्षालादेखील मिळू शकतो. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर शहरात जात फॅक्टर व व्यक्ती पाहून मतदान केले जाते. त्यात नाते संबंधाला विशेष महत्त्व दिले जाते. येथे सहसा पक्षीय राजकारणाला महत्त्व दिले जात नाही. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या विविध पक्षांच्या उमेदवारी वाटपावरून आला आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या चारच पक्षांचा सहभाग सांप्रत निवडणुकीमध्ये दिसून येतो. पण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक उमेदवार या पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीकच अन्यथा दुसरा पक्ष, तेही नाही मिळाले तर अन्य राजकीय पक्षांचे दरवाजे धुंडाळून झाल्यावर पर्याय म्हणून काहींनी अपक्ष अर्ज भरला आहे. काही समजदार सरळ सरळ थांबून घेतात. पण अगोदर तु नही और सही...! असा प्रकार इच्छुक उमेदवारांकडून होत असल्याने येथे पक्षनिष्ठा असलेल्यांनाही तशी काहीच किंमत नाही. त्यामुळे प्रत्येकजण व्यक्तिगत पातळीवर प्रचार करतो; मात्र पक्षाचा उमेदवार असल्यास नेते व कार्यकर्ते त्या त्या प्रभागात प्रचार करीत असतात. दरम्यान, उमेदवारांच्या व्यक्तिगत गाठीभेटीबरोबर पक्षीय नेत्यांच्या प्रचार रॅली काढल्या जात आहेत. काल शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा नेते अजय चौधरी, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, भूषण अडसरे, छोटू पवार, कल्पेश कदम आदींसह उमेदवार धनंजय तुंगार, मंगला आराधी, रु पाली सोनवणे आदी सर्वच प्रभागातील उमेदवार सामील झालेले होते. याच रॅलीपूर्वी लक्ष्मीनारायण चौकातील भद्रकाली देवीला प्रचाराचा नारळ फोडून शिवसेनेने प्रचारास सुरुवात केली. गावात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आदी पक्षांच्या प्रचार रॅलीने गावात निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. गावात प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात झाली आहे.