छावा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

By Admin | Updated: July 2, 2014 00:27 IST2014-07-01T22:47:39+5:302014-07-02T00:27:31+5:30

छावा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

Ransom crime on Chhawa district | छावा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

छावा जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

नाशिक : गंगापूररोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या सहारा हस्तकला व शिल्पकला प्रदर्शनाच्या संचालकाकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष करण गायकर व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून डोंगरे वसतिगृह मैदानावर सहारा आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे़ सदर प्रदर्शनात गृहोपयोगी तथा सजावटीच्या वस्तूंचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष करण गायकर व त्यांचे दोन साथीदार २२ ते २८ जून या कालावधीत प्रदर्शनाचे संचालक रिझवान अहमद खान (४१, खान हाऊस, विक्रोळी, पश्चिम मुंबई) यांच्याकडे गेले़ त्यांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली़ (प्रतिनिधी)

Web Title: Ransom crime on Chhawa district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.