छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा
By Admin | Updated: January 13, 2017 01:33 IST2017-01-13T01:33:14+5:302017-01-13T01:33:28+5:30
छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा

छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा
नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरे सध्या तुरुंगात आहे. त्याच्या पत्नीने एका इसमाला कर्जाची रक्कम वसुलीकरिता जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित प्रीती छबू नागरे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रीती नागरे ही मायक्रो फायनान्सची व्यवस्थापक असून, या फायनान्सकडून फिर्यादी विशाल सुरेश दिंडे (३२, रा. गंजमाळ) याने एक लाख ८७ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी एक लाखाची परतफेड केली असून,
उर्वरित रक्कमेच्या वसुलीसाठी नागरे हिने दिंडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सज्जड दम भरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिंडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून छबू नागरेची पत्नी प्रितीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, प्रितीचा शोध घेतला जात आहे. दिंडे यांनाही प्रितीचा पत्ता माहीत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. दिंडे यांच्याशी प्रितीने साधलेला अर्वाच्य भाषेतील संवादाची ध्वनीफित सर्वत्र व्हायरल झाली असून, ही ध्वनीफित पोलिसांनी मिळविली आहे. ध्वनिफितमध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने नागरे हिने संवाद साधला असून, दिंडेकडून क र्जाची रक्कम वसुलीसाठी धमकावल्याचे लक्षात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सदर गुन्ह्णाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे करीत आहेत. कर्जापोटी जरी रक्कम दिली असेल तर ती वसूल करताना कुठल्याही प्रकारे संबंधित कर्जदाराची छळवणूक न करता त्याच्याकडून रक्कम घेणे कायद्याच्या दृष्टीने अपेक्षित आहे. उसनवार दिलेली कर्जाची रक्कम घेताना संबंधितांने जर दमदाटी व संबंधिताला धमकाविण्याचा प्रयत्न केला तर ती कायद्याने खंडणी वसुली म्हणून ग्राह्ण धरली जाते, अशी माहिती तांबे यांनी दिली आहे. याप्रकरणी लवकरच संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले जाणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.