शिवसेनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख कांदे यांच्याविरुध्द खंडणी व अपहरणाचा गुन्हा
By Admin | Updated: April 3, 2017 18:39 IST2017-04-03T18:01:21+5:302017-04-03T18:39:13+5:30
शिवसेनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख सुहास कांदे व त्यांच्या साथीदारांविरुध्द व्याजाचे पैसे वसूलीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे ग्रामिण जिल्हाप्रमुख कांदे यांच्याविरुध्द खंडणी व अपहरणाचा गुन्हा
नाशिक : शिवसेनेचे सुहास कांदे व त्यांच्या साथीदारांविरुध्द व्याजाचे पैसे वसूलीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशाी, गंगापूररोड येथे राहणारे अजय जाखडी यांनी व्याजाने कांदे यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले होते. या रकमेची परतफेडदेखील करण्यात आली व रकमेवरील तीन लाख ७५ हजार रुपये व्याजाच्या रकमेपैकी एक लाख पाच हजार रुपयेही जाखडी यांनी संबंधितांना दिले आहे. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी संशयित कांदे व त्यांचे साथीदारांनी जाखडी यांने अपहरण केल्याची फिर्याद त्यांची पत्नी उमा जाखडी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रकमेसाठी संशयित विलास हिरे, फरहान यांनी दबाव वाढविला होता. गेल्या शुक्रवारी महात्मानगर येथे अजय यांना बोलावून घेत त्यांचे अपहरण केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे उमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या तीघा संशयितांविरुध्द खंडणी वसुली व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदे यांच्याविरुध्द यापुर्वी एका घटनेत खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून न्यायालयाकडून त्यांनी अंतरीम जामीन मिळविला आहे. दरम्यान, गंगापूर पोलीस ठाण्याकडून जाखडी अपहरण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट-३कडे देण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे अधिक तपास करीत आहेत.