शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:29 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.

वसंत तिवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसºया सप्ताहात त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत जंगलातील कैºया, करवंदे, मोहाची फुले, तोरणे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण-पश्चिमेस तसेच उत्तर बाजूला घनदाट जंगल असून, मुबलक प्रमाणात निसर्गाच्या कृपादृष्टीने रानमेव्याने लगडलेली दाट झाडी आहेत. त्यात करवंदच्या काटेरी जाळ्या, मोहाचे अवाढव्य असलेले झाड, त्या झाडाखाली मोहाच्या पडलेल्या पांढºया पण गुंगी येईल अशा फुलांचा सडा, तर काही रायवळ समजली जाणारी कैऱ्यांचे घड असलेली आंब्याची झाडे, महिना दीड महिन्यात येणारी जांभळे व चिंचाचा बहर तर जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आला आहे. गावठी चॉकलेट रंगाचे आवळे रस्त्यावर वाटे घालून बसलेल्या रानमेव्याच्या विक्रेत्यांभोवती कडे करून वाटसरू खरेदी करताना दिसतात. विशेषत: उन्हाळ्यात सर्वांनाच आंबट खाण्याचा मोह होतो. कैºयांचा लसणी मिरची व मीठ टाकून केलेला ठेचा जेवणाची निश्चितच गोडी वाढवतो.कच्च्या करवंदाचे लोणचे, भाजी, आवळ्याचे अनेक पाचक गुण असलेला मोरावळा, मुरांबा, आवळा कँडी यांनी अधिक पसंती असते. मोठ्या हॉटेल्समध्ये करवंदाच्या लोणच्याला चांगली मागणी असते. मोहाच्या फुलालाही मागणी असते.-----------लॉकडाउनमुळे वाढल्या चिंतादिवाळी संपल्यानंतर त्र्यंबकेश्वरला स्थलांतर होत असते. वैशाख ज्येष्ठात खरीप हंगाम सुरू होतो. रोप तयार करण्यासाठी जमीन भाजणी सुरू होते; पण तोपर्यंत दोन पैसे गाठीला असावेत म्हणून अनेक कुटुंबे शहरात स्थलांतर करून दोन पैसे कमावतात; पण यावर्षी लोकांचे गणित चुकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे कामच बंद पडले. हाती पैसे नसल्याने लागवडीची चिंता. दररोजच्या पोटापाण्यासाठी रानमेवा विकून जेवणाची भूक भागविली जाते. आता लॉकडाउनमुळे तेही शक्य नसल्याने या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक