शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिकच्या मैदानावरील ‘रणजी क्रिकेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:50 IST

रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. दि. १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट विरुद्ध सौराष्ट हा रणजी क्रिकेट सामना होणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये नऊ रणजी सामने झाले आहेत. या मैदानावर अनेक विक्रमांचा पाऊस पडला असल्याने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाशिकचे मैदान अनेक खेळाडूंना लाभदायक ठरले आहे. नाशिकच्या मैदानावर खेळणाऱ्यांना मोठी संधी मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या मैदानावर आजवर अनेक विक्रम झाले आहेत. नाशिकचे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या विक्रमांचा साक्षीदार आहे.सन २००५ पासून होणाºया रणजी सामन्यामुळे नाशिकचे नाव रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून घेतले जाते. नाशिकच्या आल्हाददायक वातावरणात आजवर झालेल्या रणजी सामन्यात खेळाडूंनीदेखील नाशिकच्या वातावरणात खेळण्याचा आनंद काही वेगळाच असल्याचे सांगितले आहे. राज्यात अनेक ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळणारे अनेक खेळाडू हे नाशिकमध्ये प्रथमच खेळत असल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये खेळण्याची उत्सुकता असतेच. अशीच उत्सुकता महाराष्टÑ आणि सौराष्टÑातील अनेक खेळाडूंच्या बाबतीत आहे.सन २००५ पासून नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर एकूण नऊ रणजी क्रिकेट सामने झाले आहेत. त्यामध्ये १९ शतकांची नोंद झाली आहे. यामध्ये अभिनव मुकुंद आणि आकाश चोप्रा यांच्या त्रिशतकाचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुरली विजय याच्या द्विशतकानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. नाशिकच्या मैदानावर झालेल्या नऊ रणजी सामन्यांपैकी चार सामन्यांचा निकाल लागला आहे तर पाच सामने अनिर्णित राहिले. तीन सामन्यांमध्ये महाराष्टÑाला विजय मिळाला आहे तर एक सामना मुंबईने जिंकला आहे. आता या सामन्यात महाराष्ट्रासह सौराष्टÑची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.ग्राउंड क्युरेटर रमेश म्हामूनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल असे मत खेळाडूंनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या मैदानावर निर्णायक सामना होण्याची शक्यता असल्याने दोन्ही संघांना गुणांची वाढ करण्याची संधी आहे. सकाळच्या सत्रात पडणाºया दवबिंदूंमुळे मात्र खेळपट्टी गोलंदाजांना साथ देऊ शकते, त्यामुळे गोलंदाजांची कामगिरीदेखील महत्त्वाची ठरणार आहे. या मैदानावर फलंदाजांचे विक्रम असल्यामुळे केदार जाधवच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.नाशिकमधूनच  उघडले भारतीय क्रिकेट संघाचे द्वारनाशिकमध्ये रणजी सामने खेळत असतानाच या मैदानावरील कामगिरीच्या आधारे अनेकांना भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले. काहींची नावे तर भारतीय संघात याच मैदानावरून घोषित झाली आहेत. त्यामुळे नाशिकचे मैदान अनेकांना ‘लकी’ ठरले आहे. त्यामध्ये भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा, ुंमुनाफ पटेल, उमेश यादव, कुलदीप यादव आणि मुरली विजय यांचा समावेश आहे. २००८ मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळताना तामिळनाडूचा मुरली विजय याने २४३ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या आधारावर त्याची भारतीय संघात नागपूर येथील कसोटीसाठी निवड झाली आणि त्याला दुसºयाच दिवशी नाशिकहून नागपूर गाठावे लागले होते.रोहित शर्माच्या बाबतीतही अशीच घटना आहे. आपल्या सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते अशी परिस्थिती असताना सातत्याने त्याची संधी हुकली जात होती. २०१० मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळत असतानाच त्याची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड झाली. नीलेश कुलकर्णीसाठीही नाशिकमधूनच राष्टÑीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले होते. कुलदीप यादवने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चुणूक दाखविली होती. मुनाफही नाशिकमध्येच प्रकाशझोतात आला.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकNashikनाशिक