शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:54 IST

घोटी : महाराष्ट्र रणजी क्रि केट संघाचे प्रशिक्षक रणजीपटू शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून दरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. यादरम्यान सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते सुमारे ३०० फुट खोल दरीत ते पडल्याचे प्रशासनाने सांगितले.

ठळक मुद्देघोटी : शोध मोहीमेनंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला ; क्र ीडा क्षेत्रात हळहळ

घोटी : महाराष्ट्र रणजी क्रि केट संघाचे प्रशिक्षक रणजीपटू शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून दरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला.मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. यादरम्यान सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते सुमारे ३०० फुट खोल दरीत ते पडल्याचे प्रशासनाने सांगितले.गवळी हे खोल दरीत पडल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टिमला पाचारण करण्यात आले होते. मात्र अंधार पडल्याने व पावसाची संततधार सुरू असल्याने रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्र ीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी (दि.२) पहाटे ५ वाजेपासून तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुर, कसारा व नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे,अक्षय राठोड, विनोद आयरे, मयुर गुप्ता, लक्ष्मण वाघ, दत्ता बाताडे, मानस लोहकरे, दयानंद कोळी, विकास लाटे, मिलिंद लोहकरे, किरण धाईजे यांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले.बुधवारी (दि.२) सकाळी दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पुलाखालील एका पाण्याच्या डोहाच्या कडेला अडकलेल्या स्थितीत श्ेखर गवळी यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आला.महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रि केट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. शेखर गवळी हे १९९ते २००४ पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रि केट खेळलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीनियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असत. या दुखद घटनेमुळे क्र ीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.(फोटो ०२ शेखर गवळी,१)इगतपुरी : हॉटेल गणाकाच्या मागील बाजुस असलेल्या डोहातुन शेखर गवळी यांचा मृतदेह काढतांना आपत्ती व्यवस्थापन टीम.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगDeathमृत्यू