रणजित पटेल ठरला 'रन फॉर पीस' २०१७चा मानकरी
By Admin | Updated: February 12, 2017 13:44 IST2017-02-12T13:44:22+5:302017-02-12T13:44:22+5:30
पोलीस प्रशासन नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर पीस' मॅरेथॉन २०१७ चा रणजित पटेल हा मानकरी ठरला

रणजित पटेल ठरला 'रन फॉर पीस' २०१७चा मानकरी
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 12 - पोलीस प्रशासन नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर पीस' मॅरेथॉन २०१७ चा रणजित पटेल हा मानकरी ठरला आहे. २१ किमी स्पर्धेत सहभागी होऊन (१:०७) वेळ नोंदवत त्याने हे यश संपादन केले. रविवारी (दि.१२) गोल्फ क्लब मैदानापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. विविध गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्रामसिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, सिनेअभिनेत्री सायली भगत, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, माजी पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. २१ किमी पुरुष वयोगटात रणजित पटेल (प्रथम), नीरज कुमार (द्वितीय), गुरुजित सिंग (तृतीय) यांनी विजय मिळवला.