उमराणे च्या उपसरपंचपदी रंजना जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:13 IST2020-03-09T14:12:25+5:302020-03-09T14:13:42+5:30
उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना मोहन जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद हे आवर्तन पद्ध्तीनुसार असल्याने उपसरपंच शितल जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

उमराणे च्या उपसरपंचपदी रंजना जाधव यांची निवड झाल्यानंतर सत्कारप्रसंगी विलास देवरे, सरपंच लताबाई देवरे,सिमा गोधडे, सरला देवरे, हिराबाई जमधाडे, राजेंद्र पुंडलिक देवरे, प्रकाश ओस्तवाल, संदीप पवार, देवका पवार, चिंतामण देवरे,आदि .
ठळक मुद्देपरिणामी रिक्त झालेल्या पदासाठी विद्यमान सरपंच लताबाई बाळासाहेब देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी रंजना जाधव ह्या इच्छुक असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
निवडीप्रसंगी बाजार बाळासाहेब देवरे, सदस्य शितल जाधव, धनराज देवरे, अमित देवरे, सचिन देवरे, ज्योती देवरे, रमेश देवरे, ग्रामविकास अधिकारी जे.ए.झाल्टे आदि उपस्थित होते.
-