कोळम उपसरपंचपदी रंजना चव्हाण बिनविरोध
By Admin | Updated: August 26, 2016 22:26 IST2016-08-26T22:25:11+5:302016-08-26T22:26:18+5:30
कोळम उपसरपंचपदी रंजना चव्हाण बिनविरोध

कोळम उपसरपंचपदी रंजना चव्हाण बिनविरोध
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोळमच्या उपसरपंचपदी रंजना भाऊसाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान उपसरपंच राजश्री मच्छिंद्र आवारे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्तपदी ही निवड झाली. सरपंच सोपान चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्रीमती टी. एन. ढोणे यांनी काम पाहिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजश्री आवारे, विठाबाई आवारे, अर्चना चव्हाण, कडूबा ठाकरे, अर्चना कदम, उखा मोरे, बाबासाहेब सोमासे आदि उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थ नारायण आवारे, भगवान चव्हाण, अशोक मंत्री, वाल्मीक चव्हाण, सीताराम बढे, मोहन कदम, चिंधू शिंदे, माधव आवारे, सोमनाथ चव्हाण, योगेश चव्हाण आदिंनी प्रयत्न केले. (वार्ताहर)