राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे
By Admin | Updated: September 18, 2016 00:24 IST2016-09-18T00:23:17+5:302016-09-18T00:24:02+5:30
तिढा सुटला : रस्सीखेचीनंतर सर्वसंमतीने नियुक्ती

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून, आमदार जयंत जाधव यांच्या जागी युवा नेते रंजन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली रस्सीखेच पाहता, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे यांच्या नावाला पसंती देत आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारीही सोपविली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदाबाबत अनेक वेळा अटकळी बांधल्या गेल्या. आजवर या पदावर भुजबळ समर्थकांची वर्णी लावली जात असल्याचा एका गटाचा कायमच आक्षेप राहिला परिणामी पक्ष संघटना वृद्धीवर त्याचा परिणाम होत गेला, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी ही गोष्ट घातक ठरू पाहत होती.