आवास योजनेच्या अर्जांसाठी रांगा
By Admin | Updated: March 5, 2017 01:22 IST2017-03-05T01:22:08+5:302017-03-05T01:22:22+5:30
सातपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज विक्रीस प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

आवास योजनेच्या अर्जांसाठी रांगा
सातपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज विक्रीस प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. गेल्या चार दिवसांत सातपूर विभागातील सुमारे तीन हजार नागरिकांनी अर्ज घेतले असून, विभागीय कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडत आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वांसाठी घरे अंतर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून घरकुलधारकांना अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसामान्य लोकांना अल्प दरात घरे उपलब्ध होणार असल्याने या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. आपल्या घराचे स्वप्न साकार व्हावे म्हणून सर्वसामान्य तसेच झोपडपट्टीवासीयांकडून अर्ज घेण्यासाठी झुंबड उडत आहे.
महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या शेजारील टॉऊन हॉल येथे २८ फेब्रुवारीपासून या योजनेतील अर्ज विक्र ीस प्रारंभ करण्यात आला आहे. अर्ज घेण्यासाठी पहाटेपासून रांग लावली जात आहे. शेकडोंच्या संख्येने गर्दी होत असून, आपापसात वाद होत असल्याने बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (वार्ताहर)